गुंतवणुकीच्या प्रलोभनाने ४९ लाखांची फसवणूक; कंपनीच्या चेअरमनसह तिघांवर पोलिसांत गुन्हा



बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ४९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबई : बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ४९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी धारावी पोलिसांनी बायो इस्टेट सोल्युशन प्रा. लि. कंपनीचे चेअरमन शिवाजी वाळके, संचालक घनश्याम शर्मा आणि शकील खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




तक्रारदार आमिर इद्रीस खान (५१) गारमेंटचा व्यवसाय करतात. २०१९ मध्ये त्यांचा मित्र नासिर शेख याने 'बायो इस्टेट सोल्युशन' कंपनीच्या 'मंथली रेंटल इन्कम सिस्टिम' या योजनेत गुंतवणूक केल्याची माहिती दिली. कंपनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा देत असल्याचे सांगत त्याने खान यांनाही गुंतवणुकीचा सल्ला दिला. त्यानंतर खान हे शेखसोबत धारावीतील कंपनीच्या शाखेत गेले. तेथे कंपनीचे चेअरमन शिवाजी वाळके यांनी 'बायोकॉईन' या क्रिप्टो चलनात गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार जानेवारी २०१९ मध्ये खान यांनी स्वतःचे आणि नातेवाईकांचे मिळून ६ लाख ४६ हजार ८०० रुपये कंपनीला रोख दिले. कंपनीच्या वेबसाईटवर गुंतवणुकीचे विवरण दाखवून अधिक परतावा मिळेल, असे वारंवार सांगितले जात होते.




४८ महिन्यांत दुप्पट रक्कम




वाळके यांनी खान यांना 'मंथली रेंटल इन्कम सिस्टिम' योजनेत गुंतवणूक केल्यास ४८ महिन्यांत मूळ रक्कम आणि नफा मिळून दुप्पट रक्कम परत मिळेल असे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवून खान, त्यांची पत्नी सहानी, मेहुणे अमजद आणि मित्र पुष्पेंद्र बडाला यांनी गुंतवणूक केली. खान आणि त्यांच्या पत्नीने १० लाख, बडाला यांनी १५ लाख तर अमजद यांनी १८ लाख रुपये गुंतवले. अशा प्रकारे एकूण ४३ लाख रुपयांची गुंतवणूक केली.




कोरोनामुळे कंपनीचे मुंबईतील धारावी कार्यालय बंद




जुलै २०१९ पासून खान आणि त्यांच्या पत्नीला नऊ महिन्यांत सुमारे ३.६ लाख रुपये मिळाले. मात्र मे २०२० पासून पैसे मिळणे बंद झाले. कोरोनामुळे कंपनीचे धारावी कार्यालय बंद करण्यात आले. वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही. फेब्रुवारी २०२३ मध्ये इद्रीस यांनी कल्याण येथील मुख्य कार्यालयात जाऊन शर्मा आणि खान यांची भेट घेतली. त्यांनी ३९ लाख रुपये परत देण्याचे आश्वासन देत चेक दिले. मात्र त्यापैकी सुमारे २३ लाख रुपयांचे चेक बाऊन्स झाले.

Post a Comment

أحدث أقدم
Loading...

Breaking News

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume