मुंबईतील 'या' सोसायटीतील लोक उतरले रस्त्यावर; वनसंरक्षक अधिकाऱ्यांच्या विरोधात दिल्या घोषणा



या प्रकरणामुळे परिसरात अनिता पाटील यांच्या विरोधात नाराजीचे वातावरण असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी या सर्व मुद्द्यांवर तातडीने लक्ष देऊन योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील यांच्या मनमानी कारभाराविरोधात अभिनव नगर येथील स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत तीव्र आंदोलन केले. अनिता पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या कामकाजाबाबत परिसरात मोठा असंतोष निर्माण झाला.त्यांच्या मनमानी कारभाराचा फटका स्थानिक रहिवासी आणि आदिवासी बांधवांना बसत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.अभिनव नगर या उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांच्या जागेत वनसंरक्षकांच्या आदेशानुसार जवळपास 2250 चौ.फुटांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व राज सुर्वे यांनी केले होते.


या प्रकरणामुळे परिसरात अनिता पाटील यांच्या विरोधात नाराजीचे वातावरण असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी या सर्व मुद्द्यांवर तातडीने लक्ष देऊन योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे. अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.


अनिता पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या कामकाजाबाबत परिसरात मोठा असंतोष निर्माण झाल्याचे येथील आदिवासी बांधव व आंदोलकांचे म्हणणे आहे.


अनेक वर्षांपासून या परिसरात वास्तव्यास असलेल्या आदिवासी कुटुंबांच्या घरांवर त्यांच्याकडे पुरावे आणि कागदपत्रे असतानाही तोडक कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारवाईमुळे काही दिवसांपूर्वी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि दगडफेकीची घटना देखील घडली होती.

Post a Comment

أحدث أقدم
Loading...

Breaking News

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume