भाजप-शिंदेसेना महायुतीचे ११ प्रभाग समित्यांवर वर्चस्व! ठाकरे बंधूंकडे तीन प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद



महापालिकेतील १७ प्रभाग समित्यांच्या निवडणुकीचा तिसरा अंतिम टप्पा सोमवारी पार पडला.

मुंबई : महापालिकेतील १७ प्रभाग समित्यांच्या निवडणुकीचा तिसरा अंतिम टप्पा सोमवारी पार पडला. त्यात पाचपैकी तीन समित्यांची निवडणूक बिनविरोध तर, उर्वरित दोन समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात तीन समित्यांच्या अध्यक्षपदाची माळ भाजप नगरसेवकांच्या गळ्यात पडली, तर एका समितीचे अध्यक्षपद शिंदेसेना, तर आणि दुसऱ्याचे अध्यक्षपद एमआयएमला मिळाले आहे. एकूण १७ पैकी ११ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची धुरा भाजप-शिंदेसेनेच्या महायुतीकडे, तर तीन समित्यांचे अध्यक्षपद ठाकरे बंधूंच्या युतीला मिळाले आहे.

गेल्या आठवड्यात गुरुवारी आणि शुक्रवारी, अशा दोन टप्प्यांत ११ समित्यांसाठी निवडणुका झाल्या तर, सोमवारी पाच प्रभागांसाठी प्रक्रिया पार पडली. 'एल' व 'एन' या समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर रीतू तावडे यांनी, तर एम पूर्व, 'एम पश्चिम', 'एस' आणि 'टी' या समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले.




साक्षी दळवी, खैरनुसा हुसेन विजयी




१. 'एस' आणि 'टी' प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या साक्षी दळवी या १० मतांनी विजयी झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार उद्धवसेनेचे सुरेश शिंदे यांना आठ मते मिळाली. या निवडणुकीत दोन मते अवैध ठरली.




२. 'एम पूर्व'च्या अध्यक्षपदासाठी एआयएमआयएमच्या खैरनुसा अकबर हुसेन या आठ मतांनी निवडून आल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिंदेसेनेच्या प्रज्ञा सदाफुले यांना पाच मते मिळाली असून, एक मत अवैध ठरले.




प्रभाग समिती महत्त्वाची का?




शहरात स्थानिक पातळीवर निर्णयप्रक्रिया प्रभावीपणे व्हावी, यासाठी प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या दैनंदिन गरजांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी महत्त्वाची यंत्रणा म्हणून या समित्या कार्यरत असतात. या समितीत अध्यक्षांसह अभियंते, आरोग्य अधिकारी, स्वच्छता अधिकारी यांचा सहभाग असतो.




प्रभाग समित्यांवर दृष्टिक्षेप




प्रभाग समिती                        अध्यक्षपद
सी, डी                              आकाश पुरोहित (भाजप)
आर उत्तर, आर मध्य         प्रकाश दरेकर (भाजप)
आर दक्षिण विभाग            लीना देहेरकर (भाजप)
ए,बी, ई                             ज्ञानराज निकम (काँग्रेस)
एफ दक्षिण, एफ उत्तर       मानसी सातमकर (शिंदेसेना)
पी पूर्व, पी पश्चिम               हैदर अली शेख (काँग्रेस)
जी उत्तर                           यशवंत किल्लेदार (मनसे)
जी दक्षिण                         पद्मजा चेंबूरकर (उद्धव सेना)
के पश्चिम                          रोहन राठोड (भाजप)
के दक्षिण, के उत्तर           प्रकाश मुसळे (भाजप)
पी दक्षिण                         श्रीकला पिल्ले (भाजप)
एच पूर्व, एच पश्चिम          रोहिणी कांबळे (उद्धवसेना)
एल                                 विजयेंद्र शिंदे (शिंदेसेना)
'एम पश्चिम'                     आशा मराठे (भाजप)
एन                                 अश्विनी मते (भाजप)
एस, टी                           साक्षी दळवी (भाजप)
एम पूर्व                          खैरनुसा अकबर हुसेन (एमआयएम)


Post a Comment

Previous Post Next Post
Loading...

Breaking News

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume